शेतकरी गट नोंदणी व फायदे : आत्मा अंतर्गत शेतकरी गट अर्ज नमूना

आज आपण पाहणार आहोत शेतकरी गट कसा स्थापन करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत ?

शेतकरी गट स्थापना

शेती विषयक सरकारी योजना तसेच सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडेल अशी माहिती आपण वेबसाइटवर  देत असतो.

 

शेतकरी गटाचे फायदे 

 

Ø  शेतकरी गटाच्या माध्यमातून तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शेकता.

Ø  तुमच्या गटाच्या माध्यमातून तुम्ही शेती पूरक ऊद्योग सुरू करू शकता

Ø  शेतीपूरक उद्योगांना शासनाकडून 60 टक्के पर्यन्त अनुदान मिळते

Ø  शेतीसाठी लागणारे खते बियाणे तुमच्या शेताच्या बांधापर्यंत येईल.

Ø  गटाच्या माध्यमातून उत्पादित शेट मालाला मोठ्या बाजारपेठेत नेऊ शकता

Ø  तसेच तुमचं शेतमाल तुम्ही एक्सपोर्ट देखील करू शकता

Ø  या माध्यमातून एक चांगले प्रकारचे आर्थिक स्थैर्य  

Ø  जर तुमचे गाव पोकरा  योजनेमध्ये असेल तर त्या ठिकाणीसुद्धा वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांचा शेतकरी गटाच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात.

 

शेतकरी गट स्थापन करण्याचा सर्वात मोठा फायदा

 

असा आहे की तुमच्या शेतकरी गटाच्या माध्यमातून

 तुम्ही फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरू करू शकता.

 

गट कसा स्थापन करायचा याबद्दल माहिती

 

 शेतकरी गट स्थापन करणे खूप सोपे आहे कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त 20 लोक एकत्र येऊन एक शेतकरी गट स्थापन करू शकता. तुम्हाला आत्मा अंतर्गत या गटाची नोंदणी करता येईल.  यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संपर्क करावा लागेल.  आणि त्या ठिकाणी पाचशे रुपयेचा डी डी फाडून तुम्हाला त्या सर्व सभासदांची नोंदणी करायची आहे.

 

गट नोंदणी अर्ज

थोडे नवीन जरा जुने