बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबिवल्या जातात. आता पुन्हा तीन नवीन योजना सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
त्या नवीन तीन योजना खलील प्रमाणे
1. बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे.
2. बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य
3. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या नवीन तीन योजना घोषित केल्या आहेत.
मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.