ऊस पाचट कुट्टी यंत्र अनुदान, असा करा अर्ज | Sugarcane trash cutter subsidy
ऊस पाचट कुट्टी यंत्र यंत्राच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
- या यंत्राच्या अनुदान न करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ?
- कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या यंत्राच्या खरेदीसाठी अनुदानासाठी अर्ज करू शकतात?
- दिले जाणारे अनुदान किती ?
यांच्या संबंधातील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कापूस आणि ऊस या पिकाकरिता चा 2022 करता वार्षिक कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
यासाठी लागणाऱ्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
अल्पभूधारक शेतकरी व एस सी व एस टी [प्रवर्गातील या सर्व शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 50% किंवा सव्वा लाख रुपये अशा प्रकारे दिले जातात
ईतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये याप्रमाणे अनुदान दिले जातात
ऊस जाळण्याचा विषय गंभीर आहे त्याच्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याचे कंपोस्ट तयार करणं किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत औरंगाबाद जालना उस्मानाबाद लातूर बीड हिंगोली परभणी आणि नांदेड यामध्ये शेतकरी या योजनेचे अनुदान अर्ज करू शकतात.
