नमस्कार मित्रांनो
शेतकर्यांसाठी राबविल्या जाणार्या कृषी यांत्रिकीकरण व ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अर्ज करण्याची लिंक सर्वात खाली दिली आहे त्यामुळे पूर्ण लेख वाचा.
या ठिकाणी आपण पुढील बाबी ची माहिती घेणार आहोत
- योजनेचे नाव
- योजनेची माहिती
- ट्रॅक्टर व ईतर अवजारे योजनेसाठी अर्ज कसं करावा
- अनुदान किती मिळते
- कागदपत्रे कोणती लागतात
- लाभार्थी निवड कशी केली जाते
- लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य
- लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी मिळणारी पूर्वसंमती
1. योजनेचे नाव
ट्रॅक्टर व ईतर कृषी अवजारे यासाठी राबविल्या जाणार्या योजनेचे खरे नाव आहे कृषी उन्नती योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियान
2 . योजनेची माहिती
कृषी यांत्रिकीकरण ही केंद्र व राज्यसरकारची एकत्रित योजना आहे यामध्ये केंद्र सरकार 60 टक्के निधि व राज्य सरकार 40 टक्के निधि देते. यामध्ये शेतकर्यांना विविध प्रकारच्या अवजरांकरिता अर्ज करता येतात उदा.ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे, स्वयंचलित अवजारे इत्यादी.
3. ट्रॅक्टर व ईतर अवजारे योजनेसाठी अर्ज कसं करावा
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी कृषी अवजरांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्याची लिंक सर्वात खाली देण्यात आली आहे. शेती विषयक सर्व प्रकाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करू शेकतात.
4. अनुदान किती मिळते
ट्रॅक्टर व ईतर कृषी अवजारासाठी 50 टक्के व 40 टक्के अनुदान मिळते. ज्यामध्ये अनू सूचित जाती व जमाती महिला शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकर्यांना 50 टक्के व ईतर शेतकर्यांना 40 टक्के अनुदान मिळते.
5. कागदपत्रे कोणती लागतात
याठिकाणी अर्ज करताना सर्वसाधारण प्रवर्गाच्या शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ( 7/12 ) 8 अ बँकेचे पासबुक , आधार कार्ड , इत्यादी कागदपत्रे लागतात तसेच जर ईतर प्रवर्गाच्या शेतकर्यांना जातीचे प्रमाणपत्र लागते.
6. लाभार्थी निवड कशी केली जाते
महाडीबीटी च्या पोर्टलवर शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याठिकाणी राज्य सरकारकडून ऑनलाईन लॉटरी काढली जाते. लॉटरी निघाल्यावर शेतकर्यांना त्यांची लॉटरी मध्ये निवड झाल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवला जातो.
7. लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य
ऑनलाइन लॉटरी काढताना महिला शेतकरी यांना 3 टक्के, अपंग किंवा दिव्यांग शेतकर्यांना 3 अर्ज आरक्षित असतात परंतु त्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात नसतील तर ईतर लाभर्थ्यांचा विचार केला जातो. तसेच अनुसूचीत जाती जमाती शेतकर्यांना त्यांच्या आरक्षणप्रमाणे लॉटरी मध्ये निवड केली जाते.
8. लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी मिळणारी पूर्वसंमती
लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांना पूर्वसंमती पत्र मिळते ते पत्र त्यांना ऑनलाईन प्रिंट करता येते. पूर्वसंमती मिळाल्यानंनातर विहित मुदतीत शेतकर्यांनी अवजारे खरेदी करणे आवश्यक असते.
अवजारे खरेदी केल्यावर त्यांची मोका तपासणी केली जाते त्यानंतर अनुदान मिळते.
