आज आपण सुकन्या समृद्धी योजनेच्या नियम व अटी समजून घेणार आहोत.
मित्रांनो सुकन्या
समृद्धी योजना ही भारत सरकारची योजना आहे. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत सन 2015 पासून
ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत कोणताही पालक
ज्याच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त नाहीये अशा आपल्या कन्येच्या नावे
जवळच्या पोस्टात किंवा अधिकृत बँकेत सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतो.
आवश्यक
कागदपत्रे
- मुलीच्या जन्माचा दाखला
- मुलीचे आधार कार्ड (असल्यास )
- मुलीच्या आईचे वडीलाचे आधार कार्ड
- आई किंवा वडीलाचे पॅन कार्ड (असल्यास )
- तीन पासपोर्ट साईज फोटो मुलीचे
- आई-वडिलांचे नवीन खाते उघडण्याचा अर्ज
तुम्ही कोणत्याही पोस्ट
ऑफिस मध्ये खाते उघडू शकतात मात्र बँकांच्या बाबतीत काही ठराविक शाखेत लोकांनाच
सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडता येते.
नियम व अटी
- खाते सुरू करताना किमान
२५० रुपये
भरून खाते सुरु करता येईल
- एका आर्थिक वर्षामध्ये किमान दरवर्षी २५० किंवा १५०००० रुपये भरता येईल.
- खाते सुरू करताना मुलीचे
वय दहा वर्षापेक्षा जास्त नसावे.
- खाते उघडल्यापासून १५ वर्षे पैसे भरावे लागतात.
- खाते उघडल्यानंतर २१ वर्षानंतर पैसे वापस मिळतील.
- किंवा मुलीच्या लग्न झाल्यावर पूर्ण पैसे मिळतील.
- जर तुमची मुलगी १० वर्षाची असेल व १८ व्या वर्षी मुलीचे लग्न झाले तर
- खाते उघडल्यापासून किमान मुलीच्या १८ वर्ष होईपर्यंत पैसे भरावे लागेल.
- जर १८ व्या वर्षी मुलीचे लग्न झाले तर मुलीच्या लग्नानंतर खाते बंद होईल व सर्व पैसे व्याजासहित काढून घेता येईल.
- मुलगी १० वी पास झाल्यावर देखील तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढू शकतात.
- तसेच मुलगी ५० टक्के रक्कम मुलगी first year ला गेल्यावर काढता येईल.
सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार व्याज ७.६ टक्के ने चक्रवाढ व्याजाने मिळतात.