तुमच्या गावात कुठे होणार शेत रस्ते ? निविन होणार्‍या शेत रस्त्यांची यादी व मिळणारा निधी

 शेतीसाठी पानंद रस्ते योजना

शेत पाणंद रास्ते योजना


 शेतकऱ्यांसाठी शेती करत असताना अतिशय निकडीचे महत्त्वाचे म्हणजे  शेत रस्ते किंवा शिवार रस्ते.  शासनाच्या अनुदानातून शेत रस्ते बनवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या रस्त्यांची यादी आता आपण पाहणार आहोत.

 

याचबरोबर या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करणारा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 25 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.  आणि या शासन निर्णय बद्दलची माहिती देखील पाहणार आहोत

 

तसेच पात्र झालेल्या लाभार्थ्यांची माहिती याच बरोबर यांना कुठल्या अटी शर्ती च्या आधारावर रस्ते दिले जाणार आहेत त्याच्या बद्दलची माहिती देखील पाहणार आहोत.  

 

शेतकऱ्यांना शेत रस्ते बनवण्यासाठी पालकमंत्री पांदन रस्ते योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात होती. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणारे विविध प्रकारच्या अडचणी लक्षात घेता नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक शासन निर्णय घेऊन मातोश्री शेत-शिवार पानंद रस्ते योजना सुरू करण्यात आली.

 

योजनेमध्ये वेळापत्रक देण्यात आले होते👇👇


यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केले जावेत.  आणि त्यानंतर 15 जून 2022 पर्यंत याला मंजुरी देऊन रस्ते मंजूर करण्यात यावे.

 परंतु नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 हा सहा महिन्याचा कालावधी आहे.


त्यामुळे यापूर्वी 2020-21 मध्ये जे प्रस्ताव आलेले आहेत त्यांना मंजूरी देऊन ही मातोश्री शेत पाणंद रस्ते  योजना सुरू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी 2021 मध्ये प्राप्त प्रस्तावातील शेतरस्त्यांना मंजूरी देण्यात आली आहे.  


मंजूर यादी व अनुदान


मातोश्री ग्रामसमृद्धी शेत शिवार पानंद रस्ते योजनेच्या अंतर्गत जे खडीचे रस्ते होणार आहे त्याच्यासाठी 23 लाख रुपये प्रति किलोमीटर व कच्चे रस्ते याच्यासाठी नऊ लाख रुपये प्रति किलोमीटर एवढे अनुदान दिले  जाणार आहे.


 गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव देण्यात आले होते या मंजूर झालेल्या प्रस्तावांची यादी या शासन निर्णय बरोबर प्रकाशित करण्यात आली आहे.

 

👇👇शासन निर्णय व यादी पाहण्यासाठी 👇👇


👉येथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने